IND vs SL 1st Test: श्रीलंकेला धक्का... सामना सुरू असताना स्टार फलंदाजाला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल; नेमके काय घडले?

IND vs SL 1st Test: Dinesh Chandimal Injured While Fielding : पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाजाला सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने खबरदारी म्हणून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
Dinesh Chandimal shoulder and neck injury while fielding

Dinesh Chandimal shoulder and neck injury while fielding

esakal

Updated on

Chandimal rushed to hospital for precautionary scan: यजमान श्रीलंकेचा संघ आणखी अचडणीत सापडला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावातील १७८ धावांत भर घालताना चौथ्या दिवशी २७६ धावांची आघाडी घेतली आहे. त्यात त्यांचा प्रमुख फलंदाज दिनेश चंडिमल याला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. भारताने दुसऱ्या डावात ८१ धावांवर तीन विकेट्स गमावल्या आहेत. पहिल्या डावातील शतकवीर देवदत्त पडिक्कल दुसऱ्या डावात अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com