Shreyas Iyer is fit to play in the ODIs, received fitness certificate from BCCI CoE
esakal
India vs New Zealand ODIs Shreyas Iyer update: श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीतून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. त्याने मुंबई संघाचे नेतृत्व करताना श्रेयसने काल हिमाचल प्रदेशविरुद्ध जयपूरमध्ये ५३ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला बरगड्यांजवळ दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तीन महिने क्रिकेट मैदानातून दूर रहावे लागले होते. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसकडून (CoE) मध्ये तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेतली आणि विजय हजारे ट्रॉफीतून दमदार पुनरागमन केले.