Bigg Boss OTT 3 : डिव्हॉर्समुळे विवाद आता बिग बॉसमध्ये करणार फटकेबाजी? दिग्गज क्रिकेटर दिसणार वेगळ्या रूपात

Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawan : 'बिग बॉस ओटीटी 3' ची घोषणा झाली असून हा लोकप्रिय शो जूनमध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawan
Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawansakal

Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawan : 'बिग बॉस ओटीटी 3' ची घोषणा झाली असून हा लोकप्रिय शो जूनमध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे. घोषणेसोबतच आता या शोमध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या स्पर्धकांची नावेही समोर येऊ लागली आहेत. मोठी बातमी म्हणजे एक दिग्गज भारतीय क्रिकेटर देखील या शोचा भाग असणार आहे. हा क्रिकेटर दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर शिखर धवन आहे.

Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawan
Mitchell Starc KKR vs SRH : माझं करियर संपत आलं तरी मी पुन्हा येईन... 24 करोड किंमतीच्या खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. एकेकाळी तो टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू होता. त्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये खूप धावा केल्या होत्या आणि संघाला अनेक सामने जिंकण्यात मदत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

मात्र, हळूहळू खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आणि तो पुनरागमन करू शकला नाही. शिखर धवनची नुकतीच आयपीएल 2024 मधील कामगिरीही चांगली नव्हती. तो फक्त काही सामने खेळू शकला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामासाठी बाहेर होता.

Bigg Boss OTT 3 Shikhar Dhawan
Virat Kohli Orange Cap : 'ऑरेंज कॅप IPL ट्रॉफी जिंकून देत नाही....', CSKच्या माजी खेळाडूने विराट कोहलीला पुन्हा मारला टोमणा

आता शिखर धवन 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, शिखर धवनला 'बिग बॉस ओटीटी 3' साठी अप्रोच करण्यात आले आहे. मात्र, तो या शोचा भाग असेल की नाही हे निश्चित झालेले नाही.

शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या वैवाहिक जीवनाबाबतही चर्चेत होता. त्याचा पत्नी आयशा हिच्यापासून घटस्फोट झाला होता. शिखर धवनने 2023 मध्ये आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com