
Bill Gates enjoyed Vada Pav with Sachin Tendulkar: गेट्स फाउंडेशनच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त बिल गेट्स यांनी तीन वर्षांच्या कालावधीत तिसरा भारत दौरा सुरू केला आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या उल्लेखनीय भेटीसह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची भेट घेत आहेत. यावेळी त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत मुंबईच्या वडापावचा आस्वाद घेतला. सचिन सोबत मुंबईच्या वडापावची चव चाखतानाचा व्हिडीओ गेट्स यांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून शेअर केला आहे.