

Beyers Swanepoel
South African final match bizarre incident Lions team: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू बेयर्स स्वॅनपोल याने सर्वांना अचंबित केले. त्याने CSA वन डे चॅलेंज स्पर्धेतील डिव्हिजन वन स्पर्धेची फायनल अर्ध्यावर सोडून लंडनसाठी विमान पकडले. लायन्स क्लबकडून खेळणाऱ्या बेयर्सन सामन्यातील त्याची १० षटकं पूर्ण फेकली होती आणि ४४ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. पण, त्याच्या संघाला टायटन्सविरुद्ध २४८ धावांचा बचाव करताना संघर्ष करावा लागला. जोहान्सबर्गच्या वंडरर्स स्टेडियमवर २९ मार्च रोजी ही फायनल झाली होती.