क्रिकेटच्या मैदानावरील गमतीशीर घटनांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि नुकतीच ग्लोबल सुपर लीग (GSL) T20 मध्ये पाकिस्तानच्या इफ्तिखार अहमदने ( Iftikhar Ahmed ) सोडलेल्या झेलची चर्चा रंगली आहे. हा झेल घेण्यासाठी त्यानी केलेला अभिनय अन् त्यानंतर हातात आलेला चेंडू सुटल्यानंतरचा त्याचा ड्रामा पाहून सर्वांना हसून आवरेनासे झाले आहे. रंगपूर रायडर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेला इफ्तिखारची टिंगल उडवली जात आहे.