

India vs Australia 3rd Test Gabba : भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकून मालिकेची सुरुवात दणक्यात केली होती, परंतु एडिलेडवर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले. १० विकेट्सने ती कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मागच्यावेळेत Gabba येथे झालेल्या कसोटीत भारताने विजय मिळवला होता, त्यात शुभमन गिलने ९१ धावांची खेळी केली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडून ३२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतनेही नाबाद ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.