
Boxing Day Test Is Last For Rohit Sharma Like MS Dhoni : ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका रोहित शर्मासाठी शेवटची कसोटी मालिका असेल, असे सांगितले जात होते. पण भारताने मेलबर्नवरील बॉक्सिंग डे कसोटी सामना गमावला व कर्णधार रोहित शर्मा या मालिकेनंतर निवृत्ती घेईल अशी चर्चा सुरू झाली. पण सिडनी कसोटीनंतर रोहित आपली निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता होती. आज सकाळी सामन्यापुर्वीच्या पत्रकार परिषदेसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला आणि रोहित सिडनीमधील अंतिम कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत मिळाले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार रोहितने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना तो अंतिम कसोटी सामना खेळणार नसल्याचे सांगितले आणि रोहितच्या या निर्णयाला दोघांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता रोहित बॉर्डर गावस्कर मालिकेतील अंतिम सामना खेळणार नसल्याचे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.