
Irfan Pathan talk on Rohit sharma place in playing XI : मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग धरला. त्यानंतर सकाळीच रोहित शर्माला अंतिम कसोटी सामन्यातून वगळण्यात येणार असल्याची बातमी समोर आली. त्यांनतर आता रोहित अंतिम कसोटी सामना खेळणार नसल्याचे जवजवळ निश्चित झाले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) भारतीय संघाची सुत्रे हाती घेणार आहे. बातमी समोर येताच माजी क्रिकेटपटू व समालोचक इरफान पठाणने रोहित शर्मा संघात असायला हवा, असा निवडकर्त्यांना सल्ला दिला आहे.