Bangladesh players protest against BCB governance as BPL matches are boycotted
esakal
Why Bangladesh cricketers boycotted BPL? बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा भुकंप आलेला आहे. मुस्ताफिजूर रहमानवरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ( BCB) त्यांच्याच खेळाडूंकडून घरचा आहेर मिळाला आहे. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी बांगलादेश प्रीमिअर लीग ( BPL) मध्ये खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे आणि त्यांनी BCB चे संचालक एम नजमूल इस्लाम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ४८ तासांत त्यांनी राजीनामा न दिल्यास संपूर्ण BPL वर बहिष्कार टाकण्यात येईल अशी धमकी क्रिकेटपटूंनी दिली आहे.