Virat Kohli Test Cricket Retirement : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्याने पोस्ट शेअर करत त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटलं आहे. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांत ३० शतकं व ३१ अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याने ९२३० धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.