Rohit Sharma Shocks Fans With Sudden Retirement From Test Cricket
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतली होती. पण, तो कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये सक्रीय होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत त्याने खराब फॉर्मामुळे स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. तेव्हाच त्याच्या निवृ्त्तीच्या वावड्या उठल्या होत्या, परंतु त्याने सिडनी कसोटीदरम्यानच्या ब्रेकमध्ये मी इथेच आहे, कुठे जात नाही, हे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी तो India vs England कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचेही म्हणत होता. पण, आज अचानक असे काय घडले?