Shubman Gill Misses Punjab vs Sikkim Match Due To Food Poisoning
esakal
Why Shubman Gill missed Vijay Hazare Trophy match : भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. त्याआधी शुभमन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाबकडून दोन सामने खेळणार होता. पण, सिक्कीमविरुद्धच्या आजच्या लढतीत पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याचे नाव गायब दिसले. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या वन डे व कसोटी संघाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्याने सिक्कीमविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.