CAN TEAM INDIA WIN WTC AFTER T20 WORLD CUP? CURRENT POSITION EXPLAINED
esakal
Current World Test Championship points table India position : २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी अन् २०२६ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप... भारतीय संघाने सलग तीन आयसीसी स्पर्धा जिंकून क्रिकेट जगतात स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केला आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय मोक्याच्या क्षणी कच खाणारा, ही ओळख आता पुसली गेली आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं जेतेपद कायम राखल्यानंतर टीम इंडियाला आता चौथ्या आयसीसी स्पर्धेचे वेध लागले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ जिंकेल असे स्वप्न पडू लागले आहे. भारतीय संघाला हे शक्य आहे का?