ICC U19 Men's Cricket World Cup Americas Qualifier : १९ वर्षांखालील संघाच्या वन डे वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील अमेरिकाज विभागात रविवारी अचंबित करणारा सामना झाला. कॅनडाच्या १९ वर्षांखालील संघाने परमन वीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर झालेल्या लढतीत अर्जेंटिनाच्या १९ वर्षांखालील संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिनाचा संघ अवघ्या २३ धावांत गारद झाला, त्यातील सात फलंदाज भोपळा फोडू शकले नाहीत. कॅनडाच्या गोलंदाजांनी वेगवान व अचूक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः गारद केले.