
Mohammad Rizwan’s Bizarre Reason for Pakistan’s Champions Trophy Exit
पाकिस्तान क्रिकेट संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला आणि यजमानांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रावळपिंडीमध्ये सततच्या पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला आणि पाकिस्तानला १ गुणासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. न्यूझीलंड आणि भारताकडून लागोपाठ झालेल्या पराभवांमुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडल्यानंतर, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाला अ गटात तळाच्या स्थानावर समाधानी रहावे लागले. या अपयशानंतर कर्णधार रिझवाननने दिलेल्या स्पष्टिकरणाची आता चर्चा रंगली आहे.