Ravindra Jadeja on Test captaincy being easier than expected : भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली नव्या दमाचा संघ या मालिकेत खेळणार आहे. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा हे दोन अनुभवी चेहरे या संघात दिसतील. कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून बरीच चर्चा रंगली आणि निवड समितीने भविष्याचा विचार करून गिलकडे नेतृत्व सोपवले. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कसोटी व अन्य फॉरमॅटचे कर्णधारपद यातला फरक समजावून सांगितला.