
Champions Trophy 2013 Controversy : बुधवारपासून (१९ फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा भारत-पाकिस्तानमधील राजकीय वादामुळे चर्चेत आली होती. या वादावर हायब्रिड मॉडेलचा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे स्पर्धेचे यजमान पाकिस्तान असला तरी भारताचे सर्व सामने दुबईमध्ये होणार आहेत. तुम्हाला माहित आहे का? २०१३ साली इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा एका घटनेमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी सर्व खेळाडूंचे मोबाईल काढून घेण्यात आले होते व खेळाडूंच्या हॉटेल बाहेर सुरक्षा रक्षक व अधिकारी तैनात करण्यात आले होते.