India & England prepare for the ICC Champions Trophy 2025 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचे लक्ष्य जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणे होते. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील लाजीरवाणी हार अन् त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खाल्लेला मार, यामुळे भारतीय संघ WTC Final ला पोहोचू शकला नाही. आता टीम इंडियाने संपूर्ण लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीकडे वळवले आहे. २०१३ नंतर भारताला ही ट्रॉफी उंचावता आलेली नाही. २०१७ मध्ये फायनलमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे हा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे.