Afghanistan vs Australia, Champions Trophy 2025 : आयसीसी स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने आज चॅम्पियन्स ट्रॉफीतील महत्त्वाच्या सामन्यात चूक केल्याचे दिसले. पाच प्रमुख खेळाडूंशिवाय स्पर्धेत दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियाला त्यांनी हलक्यात घेतले. पण, ऑस्ट्रेलियाचा संघ हा नेहमीच आयसीसी स्पर्धेत दमदार कामगिरी करतो आणि तशी आजही केली. एकवेळ सामना पूर्णपणे अफगाणिस्तानच्या हातात असल्याचे दिसत असताना ऑसी गोलंदाजांनी संघाला चांगले पुनरागमन करून दिले. मात्र, Sediqullah Atal व Azmatullah Omarzai यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभी केली.