AUS vs SA Live : भारतासमोर कोणाचे आव्हान? ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दिशेने लढणार

Australia vs South Africa Clash : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघांमध्ये उद्या (ता. २५) चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे.
Australia vs South Africa Clash.
Australia vs South Africa Clash.esakal
Updated on

रावळपिंडी, ता. २४ : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तुल्यबळ संघांमध्ये उद्या (ता. २५) चॅम्पियन्स करंडकातील ब गटातील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला पराभूत केले. त्यामुळे आता उद्याच्या लढतीतील विजय दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीत एक पाऊल टाकल्याप्रमाणे असणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक असे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज असल्यामुळे रावळपिंडी येथे होणार असलेल्या लढतीत धावांचा पाऊस पडेल, हे निश्‍चित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com