
Major Change In Champions Trophy 2025 Format : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा वाद आणखी चिघळत चालला आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्ऱॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे आणि त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही ( PCB) एक पाऊल मागे जायला तयार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( ICC) कोंडी झाली आहे. BCCIने सुचवलेला हायब्रिड मॉडेल स्वीकारला जाईल आणि भारताचे सामने दुबईत होतील, परंतु याबाबतही अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.