Viral video of Rohit Sharma’s arrival in Mumbai : भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा व त्याच्या कुटुंबिय काल मुंबईत परतले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ९ महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. धोनीनतंर चॅम्पियन्स ट्रॉफी व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा रोहित हा भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. या उल्लेखनीय यशानंतर रोहितचे मुंबईत जंगी स्वागत झाले.