Champions Trophy 2025 : टीम इंडियाची पहिली मॅच दोन दिवसांवर आली; जसप्रीत बुमराहची उणीव भासली, जाणून घ्या कॅलेंडर

CT25 Team India Full Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होतेय आणि भारताचा पहिला सामना गुरुवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे.
Team India
Team Indiaesakal
Updated on

Champions Trophy 2025 : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे आणि पहिल्याच सामन्यात त्यांना शेजारी बांगलादेशचा सामना करायचा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे या स्पर्धेचे यजमानपद असले तरी भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसारच होणार आहे. भारताने पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने २०२३च्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हायब्रिड मॉडेलनुसार होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ची ही स्पर्धा पाकिस्तान आणि UAE मध्ये १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com