AFG vs AUS Live Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान उभं करण्याचा निर्धार व्यक्त केला. पण, हा सामना सुरू असताना पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक येथील हक्कानिया मदरशामध्ये शुक्रवारी नमाजादरम्यान मोठा आत्मघाती हल्ला झाला. हा भाग लाहोर येथे सुरू असलेल्या ठिकाणापासून अंदाजे ६०० किलोमीटर दूर आहे, परंतु या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.