
भारतासमोरचा एकमेव सामना सोडला, तर न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स करंडकात उत्तम खेळ करून चांगल्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे.
आम्हाला थोडी विश्रांती कमी मिळाली आहे, पण अंतिम सामन्यात उतरण्याआधी आम्ही कारणे देत बसणार नाही. मी संघातील सर्व खेळाडूंना एकच सांगतो आहे की, बदल स्वीकारा आणि वातावरण खेळपट्टी यांच्याशी लवकरात लवकर जुळवून घ्या, असे न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड हे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पाकिस्तानात झालेल्या उपांत्य सामन्यात दर्जेदार दक्षिण आफ्रिकन संघाला अफलातून खेळ करून पराभूत केलेला न्यूझीलंडचा संघ दुबईला आला आहे. न्यूझीलंड संघाने शुक्रवारी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.