Who wins if India vs New Zealand final washout or tie?
रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आणखी एक आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज आहे. मागच्या वर्षी टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदाचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. आता १२ वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद भारताला खुणावत आहे. भारतासमोर रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. भारतीय संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिलेला, तर न्यूझीलंडला गट फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला, तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला.