Viral Video : मला हा संघ वर्षभरासाठी द्या, त्यांना 'वाघ' बनवतो! युवीचे पप्पा Yograj Singh पाकिस्तानचे कोच? म्हणाले, भारत-पाक भाऊ...

Yograj Singh’s Bold Offer to Pakistan Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये न्यूझीलंड आणि भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास संपला आहे. न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला.
Yograj Singh offers to coach Pakistan cricket
Yograj Singh offers to coach Pakistan cricket esakal
Updated on

Yograj Singh offers to coach Pakistan cricket team amid struggles : यजमान पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांतच गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंड आणि भारताकडून झालेल्या पराभवानंतर त्यांचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले. त्यांच्या या कामगिरीवर जोरदार टीका होत असताना भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे वडील व टीम इंडियाचे माजी गोलंदाज योगराज सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते पाकिस्तानी संघाला प्रशिक्षण देण्यासाठी तयार असल्याचे म्हणत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com