
Jay Shah’s Celebration After Alex Carey’s Run Out Goes Viral: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले २६५ धावांचे लक्ष्य भारताने ४८.१ षटकांत पार केले आणि ४ विकेट्सने हा सामना जिंकला. भारतीय संघाचा हा सामना पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ( ICC) चेअरमन जय शाह हेही दुबईच्या स्टेडियमवर उपस्थित होते आणि अॅलेक्स केरीची विकेट मिळताच त्यांनी केलेल्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.