Rohit Sharma’s Hamstring Woes, Shubman Gill Skips Practice: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने दोन विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. अ गटातून न्यूझीलंडही उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि आता गटातून अव्वल स्थान कोण पटकावतंय, याची चुरस रंगणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्यात त्याचा फैसला होणार आहे. अ गटातून अव्वल असलेल्या संघाला उपांत्य फेरीत ब गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघाचे आव्हान असणार आहे, तर अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ ब गटातील अव्वल संघाशी भिडेल. त्यामुळे भारत-न्यूझीलंड हे दोन्ही संघ गटात अव्वल राहण्यासाठी जोर लावतील. दुबईत होणाऱ्या या सामन्यापूर्वी टीम इंडियाने काल कसून सराव केला. पण, या सराव सत्रात घडलेल्या घडामोडी पाहता रविवारीच्या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) नेतृत्व करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.