
तीन दिवसांवर आलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे वातावरण तयार झाले आहे. काही संघ पाकिस्तानमध्ये दाखल झालेले आहेत. भारतीय संघासाठी मात्र ही स्पर्धा दुबईतच होणार आहे. त्यामुळे वेगळे वातावरण तेथे असेल. भारतीय संघाने नुकतेच इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश दिला तर न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये तिरंगी एकदिवसीय स्पर्धा जिंकली.
या दोन संघांचा अ गटात पाकिस्तान आणि बांगलादेशसह समावेश आहे. चारपैकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे हा गट डेथ ग्रुप म्हणून ओळखला जात आहे. एखादा पराभवही घातक ठरू शकतो.