
Shahid Afridi Urges Pakistan to Beat India in Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला आजपासून सुरुवात होतेय आणि पाकिस्तानी अजूनही टीम इंडिया पाकिस्तानात येत नसल्यावर नाराज आहेत. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवावी लागतेय आणि त्याचा पाकिस्तानींना खूप राग आलाय. भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. आता भारत ( IND vs PAK ) पाकिस्तान दौऱ्यावर येत नसल्याने त्यांना दुबईत जाऊन पराभूत करा, असे आवाहन माजी पाकिस्तानी महान खेळाडू शाहिद आफ्रिदीने केलं आहे. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना भारतासह सर्व संघांना हरवण्यासाठी एक खास 'गुरुमंत्र' दिला आहे.