What happens if IND vs AUS semifinal is washed out? चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय संघाने सलग तीन विजय मिळवून अ गटातून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलियाचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते आणि इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. ४ गुणांसह ब गटातून दुसऱ्या स्थानावरील संघ म्हणून अंतिम चारमध्ये आले आहेत. पण, ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला नेहमी कडवी टक्कर दिली आहे. त्यात उपांत्य फेरीच्या लढतीसाठी राखीव दिवसच नसल्याने हा सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाईल, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.