Travis Head 2023 World Cup Final century : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उपांत्य लढतीचा सामना अवघ्या काही तासांत सुरू होईल. भारतीय संघ सलग तीन विजयांची नोंद करून अ गटातून अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने ब गटात एकच विजय मिळवला असला तरी त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याचा फायदा झाला. आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची नेहमी डोकेदुखी वाढवली आहे. ट्रॅव्हिस हेड हा टीम इंडियाविरुद्ध महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये नेहमी चांगला खेळला आहे. आजही त्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष आहे आणि त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी त्याने १५० कोटी भारतीयांना डिवचणारं विधान केलं आहे.