
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना १२ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर भारतीय संघ आता थेट २० तारखेला खेळताना दिसणार आहे. चॅम्पियन्स स्पर्धेसाठी कोणताही सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एरवी बहुराष्ट्रीय स्पर्धा असली की एक-दोन सराव सामन्यांचे नियोजन केले जाते. येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेसाठीही १४ ते १७ फेब्रुवारी यादरम्यान काही सराव सामने आयोजित करण्यात आले आहेत, पण बीसीसाआयने सराव सामन्यांसाठी कोणताही रस दाखवलेला नाही.