
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्यामुळे सर्व भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. आता उद्घाटन सोहळ्यासाठीही रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याच्या वृत्ताने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
आयसीसीच्या कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धांच्या दोन दिवसअगोदर सर्व संघांच्या कर्णधारांचे करंडकासह फोटोशूट होत असते, असे फोटोशूट चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या वेळीही होणार आहे. त्यानंतर सर्व कर्णधारांची पत्रकार परिषदही नियोजित असते, पण या दोन्ही कार्यक्रमांना रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वाढली आहे. बीसीसीआयने याबाबत मात्र अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.