Jasprit Bumrah update: पुढील २४ तास महत्त्वाचे! जसप्रीत बुमराहबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, BCCI कडे...

Will Jasprit Bumrah miss Champions trophy 2025: भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah updateesakal
Updated on

Jasprit Bumrah’s scans NCA Team India: जसप्रीत बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचा फैसला होण्यासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेच्या पाचव्या कसोटीत जसप्रीतला पाठदुखीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे तो गोलंदाजीही करू शकला नव्हता आणि त्यानंतर तो मैदानापासून दूरच आहे. भारत-इंग्लंड वन डे मालिकेसाठीच्या संघात त्याचा समावेश केला गेला होता, परंतु त्यााल माघार घ्यावी लागली. त्याचवेळी त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जसप्रीत त्यानंतर BCCI च्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी गेला होता आणि तिथूनच महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com