
BIG UPDATE ON JASPRIT BUMRAH INJURY: भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळणार की नाही, हा प्रश्न सध्या सर्वांना सतावतोय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीत जसप्रीतच्या पाठ दुखावली होती आणि त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर जस्सी मैदानापासून दूर आहे आणि पुनर्वसनासाठी प्रयत्न करतोय. शनिवारी त्याच्या दुखातीचं स्कॅन केलं गेलं आणि तो अहवाल न्यूझीलंडच्या डॉक्टरकडे पाठवला गेला आहे. शिवाय BCCI ची वैद्यकीय टीमही अहवालाची वाट पाहतोय.