Champions Trophy 2025: रोहित शर्मा तोंडावर आपटणार? ज्याच्यात 'दम' नाही म्हणाला, त्याला टीम इंडियात घ्यावे लागणार; कारण...

Champions Trophy 2025 Major Updates : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता बळावली आहे आणि रोहित शर्माने नाकारलेल्या गोलंदाजाला बोलवावे लागणार आहे.
Mohammed Siraj set to return in India’s squad
Mohammed Siraj set to return in India’s squad esakal
Updated on

Mohammed Siraj set to return in India’s squad : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन वने डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या मालिकेनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईच्या दिशेने रवाना होईल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेले खेळाडूच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसतील. पण, प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या समावेशाबाबत अजूनही संभ्रम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीतची पाठ दुखावली होती आणि त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. तो नुकताच बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी दाखल झाला आहे. तेथील वैद्यकिय टीमने ग्रीन सिग्नल दिला, तर जस्सी टीम इंडियासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल. इंग्लंड मालिकेसाठी जस्सीला बॅक अप म्हणून हर्षित राणाचा संघात समावेश केला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com