
Shaheen Afridi Shuts Down Mohammad Rizwan : पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् यजमानांचे गोलंदाज उघडे पडले. न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना चोप दिला. संघातील प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह हे महागडे ठरले. त्यामुळेच रिझवानचा पारा चढलेला दिसला आणि तो आफ्रिदीवर भडकला. मग, काय पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या जावयाने लगेच उलट उत्तर दिले आणि Video Viral झाला आहे.