BIG BLOW FOR TEAM INDIA: हार्दिक पांड्याच्या फटक्यावर भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी; चेंडू गुडघ्यावर आदळला.. वेदनेने विव्हळला... मैदानाबाहेर गेला...

RISHABH PANT INJURED CHAMPIONS TROPHY 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तब्बल ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धे खेळवली जाणार आहे.
RISHABH PANT INJURED
RISHABH PANT INJURED esakal
Updated on

Team India Start Practice in Dubai Champions Trophy 2025: भारतीय संघ २०१३ नंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने शनिवारी दुबईत दाखल झाला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल या सीनियर खेळाडूंसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्यासह अनेक युवा खेळाडू खांद्याला खांदा लावून तयारीला लागले आहेत. भारतीय संघाचे पहिले सराव सत्र रविवारी पार पडले आणि यावेळी पत्रकारांशिवाय प्रेक्षकांना परवानगी दिली गेली नाही. भारतीय संघ या मोठ्या स्पर्धेत प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशिवाय दाखल झाला आहे आणि त्यामुळे गोलंदाजी विभाग काहीसा कमकुवत दिसतोय... त्यात आजच्या सराव सत्रात भारताचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आणि तोही हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) मारलेल्या फटक्यामुळे. चेंडू एवढ्या जोरात भारतीय खेळाडूच्या डाव्या गुडघ्यावर आदळला की तो वेदनेने विव्हळत जमीनीवर झोपला. हार्दिक लगेच त्याच्याकडे धावत गेला अन् फिजिओनींही धाव घेतली..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com