sunil gavaskar
sunil gavaskaresakal

सुनील गावस्करांनी 'पाकिस्तान'ची लायकी काढली; रिझवानच्या संघाला अन् शेजाऱ्यांना कानात उकळतं तेल ओतल्यासारखं वाटेल...

Sunil Gavaskar slams Pakistan Cricket team : सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान संघावर जोरदार टीका केली आहे आणि त्यांच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडवली आहे.
Published on

Sunil Gavaskar’s bold remark on Pakistan cricket : पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाकडून पाकिस्तानला पराभत पत्करावा लागला आणि अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात त्यांना बांगलादेशचा सामना करायचा आहे. भारत व न्यूझीलंड यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के झाले आहे. त्यामुळे PAK vs BAN हा सामना औपचारिक राहिला आहे. यजमान पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी बोचरी टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com