Champions Trophy 2025: टीम इंडियाचे खेळाडू 'हिशोब' मांडताना दिसले; रोहित शर्माची आकडेमोड अन् रवींद्र जडेजा बनला 'गुप्तहेर', Viral Video

Rohit Sharma Ravindra Jadeja Funny Video : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर २०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Team India
Team Indiaesakal
Updated on

Team India headshots session Video : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकाच्या जेतेपदाला गवसणी घालण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा अनुभवी मोहम्मद शमीच्या खांद्यावर असणार आहे. मनगटाच्या जोरावर चेंडूला स्वींग मिळवून देणारा मोहम्मद शमी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये तारणहार ठरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, कर्णधार रोहित व रवींद्र जडेजा कसला तरी हिशोब करताना दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com