India beat New Zealand in Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आणखी एक स्पर्धा जिंकली आणि महेंद्रसिंग धोनीनंतर ही स्पर्धा जिंकणारा तो दुसऱा भारतीय कर्णधार ठरला आहे. या सामन्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) मन जिंकणारी कृती केली.