सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
दुबई, ता. १० : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने मागील तीन आयसीसी स्पर्धांमध्ये ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तीनपैकी दोन स्पर्धा जिंकताना टीम इंडियाने लक्षणीय प्रदर्शन केले. एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चॅम्पियन्स करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवल्यानंतर रोहितने सांघिक विजयाचे मोठे समाधान असल्याचे मत व्यक्त केले.