AUS vs AFG Washout Impact: Rain Could Affect India’s Semi-Final Scenario
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अफगाणिस्तानने पुन्हा एकदा आश्चर्यचकीत कामगिरी करून ब गटात बलाढ्य संघांचं टेंशन वाढवलं आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड असे तगडे संघ ब गटात असूनही अफगाणिस्तानने स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राखले आहे. त्यांचा पुढील प्रवास आज होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीवर अवलंबून आहे. इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यामुळे अफगाणिस्तानचे मनोबल उंचावलेले आहे आणि त्यामुळे ते ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणू शकतात. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावले नसते, तर अफगाणिस्तानने तोही सामना जिंकलाच होता. आता त्या हातातून निसटलेल्या पराभवाचा वचपा काढून उपांत्य फेरीत जागा पक्की करण्यासाठी अफगाणिस्तान प्रयत्नशील आहेत. पण, त्यांच्या मार्गात पावसाचा अडथळा आहे.