
राजकोट : गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेट न खेळलेल्या चेतेश्वर पुजारा याने रविवारी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. संयमी, कणखर, लढाऊ वृत्तीच्या पुजाराने याप्रसंगी भारतासाठी प्रदीर्घ काळ खेळण्याचे भाग्य लाभल्याचे भावुक उद्गार काढतानाच कोणताही पश्चाताप नसल्याचेही स्पष्ट मत व्यक्त केले.