
Suarashtra vs Assam Live Ranji Trophy : रोहित शर्मा, विराट कोहली यांची मागील वर्षी कसोटीतील कामगिरी अत्यंत खराब झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटीत दोन्ही स्टार फलंदाजांना सहा डावांत मिळून १०० धावाही करता नव्हत्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटने पर्थ कसोटीत शतक झळकावले, परंतु त्यानंतर त्याची बॅट तळपली नाही. रोहितला पाच डावांत अवघ्या ३१ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळेच त्याने कर्णधार असूनही स्वतःला पाचव्या कसोटीतून प्लेइंग इलेव्हनबाहेर ठेवले. तेव्हाही टीम इंडियाने कसोटी संघात चेतेश्वर पुजाराला बोलावण्यात यावे अशी मागणी केली होती.