
Champions Trophy 2024: BCCI ने दोन दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी ( IND vs ENG ) भारतीय संघाच्या १५ सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर केले. रोहित शर्माच्या नेतृ्त्वाखाली खेळणाऱ्या टीमचे उप कर्णधारपद युवा फलंदाज शुभमन गिलकडे कायम राखण्यात आले आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहच्या पूर्णवेळ समावेशाबाबत रोहितच अनभिद्न आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जस्सी खेळणार नाही, हे रोहितने तेव्हाच स्पष्ट केले. जसप्रीत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला तर चांगलंच आहे, परंतु या 'जर तर'च्या आशांमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.