कॉलिन मुन्रोच्या ५७ चेंडूत १२० धावांच्या धडाकेबाज खेळीवर TKR ने St Kitts & Nevis Patriots वर १२ धावांनी विजय मिळवला.
मुन्रोने १४ चौकार व ६ षटकारांसह TKR साठी सर्वोत्तम खेळी नोंदवून निकोलस पूरनचा विक्रम मोडला.
अॅलेक्स हेल्ससोबत त्याने पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली आणि TKR ने २० षटकांत ५ बाद २३१ धावा ठोकल्या.
Trinbago Knight Riders vs St Kitts and Nevis Patriots CPL 2025 result : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या नाईट रायडर्स फ्रँचायझीचा मालकी हक्क असलेल्या त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने दणदणीत विजय मिळवला. नाईट रायडर्सचा सलामीवीर कॉलिन मुन्रो याच्या ५७ चेंडूत १२० धावांच्या ऐतिहासिक खेळीमुळे TKR ने CPL 2025 मध्ये सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सचा १२ धावांनी पराभव केला.